S M L

शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला

अहमदनगरच्या तुषार संजय कुलकर्णी याची युरोपियन देशाकडून फुड प्रोसेसिंगच्या शिक्षणासाठी निवड झालीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2018 07:15 PM IST

शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकायला शेतकऱ्याचा मुलगा निघाला पॅरीसला

हरीष दिमोटे, अहमदनगर, 19 ऑगस्ट : अहमदनगरच्या तुषार संजय कुलकर्णी याची युरोपियन देशाकडून फुड प्रोसेसिंगच्या शिक्षणासाठी निवड झालीय. शेतकरी हितासाठी काहीतरी करायचंय या जिद्दीने झपाटलेला तुषार एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून, लवकरच तो शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पॅरीसला रवाना होतोय. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी युरोपियन देशाकडून त्याला 50 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यातूनच तो हे सर्व शिक्षण घेऊन तो पुन्हा भारतात दाखल होणार आहे. लवकरच तुषार नविन तंत्रज्ञान शिकून आपल्या देशात परत येईल आणी शेतकरी हितासाठी काम करेल अशी अपेक्षा आहे.

शिर्डी जवळील सावळीविहीर या छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटूंबात जन्मलेला तुषार संजय कुलकर्णी. तुषारने बारावी पर्यन्तचे शिक्षण कोपरगाव येथील जनार्दन स्वामी विद्यालयात पुर्ण केलं. के. के. वाघ विद्यालय नाशिक येथे बि-टेक केलं आता तो म्हैसूर येथे इंटिग्रेटेड एमएससी आणी पिएचडी करत असतानाच जागतीक पातळीवर संशोधक होण्याची त्याला सुवर्ण संधी मिळाली आहे. मी शेतकरी कुटूंबात जन्मलोय आणी शेतकर्यांसाठीच काहीतरी करायला हवं असा ध्यास माझ्या मनात होता आणी शिक्षणही त्याच दृष्टीने सुरू केले असं न्यूज18 लोकमत सोबत बोलतांना तुषार म्हणाला.

म्हैसुरला शिक्षण घेताना तुषारकडे एक नवी संधी चालून आली. युरोपियन देशातील ''इरॅस्मस मुंडस'' या स्कॉलरशिपची माहिती मिळाली आणी त्यासाठी त्याने प्रयत्न केला. पॅरीस, लंडन, इटली, स्विडन या देशांचे मिळून एक विद्यापीठ तयार झाले आहे, त्यासाठी जगभरातील 25 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. भारतातील 100 विद्यार्थ्यांमधून केवळ एकट्या तूषारला हि संधी मिळाली आहे. त्याने युरोपियन कंट्रीसमोर मांडलेला विचार त्यांना आवडला आणी त्याची आता पुढील शिक्षणासाठी निवड झालीय. तुषारची आर्थिक परीस्थिती नसल्यानं त्याचा जाण्या-येण्या पासूनचा सर्व खर्च युरोपियन संघ करणार आहे.आस्मानी आणी सुल्तानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकर्यांसाठी काहीतरी करावं असा ध्यास घेऊन तुषारने घेतला आहे. येत्या 29 ऑगस्टला तो पॅरीसला जाण्यासाठी रवाना होतोय. आर्थिक संकटं आपलं ध्येय गाठणं मुळीच रोखू शकत नाहीत असं तुषार म्हणतो.

तर, मी एक सामान्य शेतकरी असून, उन्हाचे खुप चटके खाल्ले, खुप कष्ट केले. मात्र आता मुलाचे यश बघून खुप आनंद होतोय अशी प्रतिक्रीया तुषारचे वडील संजय कुलकर्णी यांनी दिली. आणि मुलं जर असे असतील तर कोणत्या आई-वडिलांना आनंद होणार नाही असे तुषारची आई म्हणाली. आपल्या मुलाच कौतूक करताना तुषारच्या आईचा अभिमानाने ऊर भरून आला आणी तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू झळकायला लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 07:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close