...म्हणून शेतकऱ्यांनी जिंतूर- परभणी महामार्ग अडवला

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2018 10:33 AM IST

...म्हणून शेतकऱ्यांनी जिंतूर- परभणी महामार्ग अडवला

परभणी, १ ऑक्टोबर २०१८- परभणीत शेतकऱ्यांनी जिंतूर-परभणी महामार्ग अडवल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी बोरी इथं रास्तारोको केला. जिंतूर तालुक्यातील कान्हड इथे ट्रान्सफार्मर जळून जवळपास १४ दिवस झाले. महावितरणकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या, निवेदनं दिली. मात्र महावितरणनं दुर्लक्ष केल्यानं जवळपास १५ गावं गेल्या १४ दिवसांपासून अंधारात आहेत.

महावितरणच्या गलथान कारभारावर शेतकऱ्यांनी रास्तारोको करून संताप व्यक्त केला. शेतीसाठी वीज नसल्याने संतापलेल्या या गावांतील शेतकर्त्यांनी जिंतूर-परभणी महामार्ग अडवला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली तेव्हा शेतकरी आणि पोलिसांत बाचाबाची झाली. शेवटी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळपर्यंत विज पुरवठा पूर्ववत करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

VIDEO : मुंबईतल्या 'बीकेसी'त निघाला अकारा फुटाचा अजगर; नागरिकांमध्ये दहशत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...