संघर्षयात्रेदरम्यान दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2017 11:23 PM IST

संघर्षयात्रेदरम्यान दोन शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

17 एप्रिल : संघर्षयात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगाव बसवंत इथे सभेत दोन शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा इशारा दिला. संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विरोधक नाशिकजवळच्या पिंपळगाव बसवंत इथं पोहोचले. यावेळी ही घटना घडली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचं बसवंत इथे भाषण सुरू होतं. तेव्हा दोन शेतकऱ्यांनी  सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर विखेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावलं. त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते. कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला.

‘सरकार कर्जमाफी देत नसेल तर, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.’ अशा घोषणा या शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. व्यासपीठावर आल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांच्या हातून विषाची बाटली आणि दोर कार्यकर्त्यांनी काढून घेतले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी दोनही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधकांनी या शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमधून सोडवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 11:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...