S M L

स्वतःला कांद्यात गाडून घेत शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन

संगमनेर येथे भुमीपूत्र शेतकरी संघटनेने हे अनोखं आंदोलन करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 08:38 PM IST

स्वतःला कांद्यात गाडून घेत शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन

06 एप्रिल : कांद्याला हमीभाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला कांद्यात गाडून घेत अनोखं आंदोलन केलं. संगमनेर येथे भूमिपूत्र शेतकरी संघटनेने हे अनोखं आंदोलन करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता.

काबाड कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला आणी शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.

कांद्याला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्या, सातबारा कोरा करावा आणी शेतीला पुर्णदाबाने वीज मिळावी या मागणी करत आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

या मोर्चाच्या वेळी काही शेतकऱ्यांनी स्वतःला कांद्यात गाडून घेत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय. भूमीपूत्र संघटनेचे कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close