मुख्यमंत्र्यांच्या काकूंकडून भाजप सरकारवर टीका...केलेत हे गंभीर आरोप

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 01:52 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकूंकडून भाजप सरकारवर टीका...केलेत हे गंभीर आरोप

चंद्रपूर, 3 जून- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेसंदर्भात शोभाताई फडणवीस यांनी वनविभागाला लक्ष्य केले आहे. वृक्ष लागवड योजनेची चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातल्या सामान्य माणसावर वनविभाग बळजबरी करत असल्याचा गंभीर आरोप शोभाताई फडणवीस यांनी केला आहे. चंद्रपुरात पत्रकार परिषद घेऊन शोभाताई फडणवीस यांनी वनविभागावर आरोप केले आहेत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेला त्यांच्याच पक्षातून खो दिला जात आहे. विदर्भात झाडं लावू नका तर मराठवाड्यात लावा, अशी भूमिका शोभाताई फडणवीस यांनी घेतली आहे. वृक्षारोपणासाठी वनविभागाने खोदलेले खड्डे बुजविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

औरंगाबाद विभागात वृक्षलागवडीची सर्वाधिक गरज..

औरंगाबाद विभागात सर्वाधिक कमी वनक्षेत्र आहे. तिथे वृक्षारोपणाची जास्त गरज आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प वनकायदा आणि वनविभागामुळे रखडले आहेत. अशा प्रकल्पासाठी आवश्यक जमीन वनखाते देत नाही. मात्र, वनविभागाकडून वृक्ष लागवडीची जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप शोभाताईंनी केला आहे.

काय आहे ही वृक्षलावगडीची योजना...

Loading...

सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्षलावगडीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. वृक्ष लागवडीत ग्रामपंचायतींना 8 कोटी तर इतर शासकीय विभागांना 6.25 कोटी वृक्ष लावगड करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्राम पंचायतींची ई-क्लास जमिनी अतिक्रमीत होऊन त्या ठिकाणी घरे तयार झाली आहे. परिणामी ग्रामपंचायतींना 8 कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट कसे पूर्ण करावे हा प्रश्न निर्माण होणार आहे. अन्य विभागाने 6.25 कोटी वृक्ष लागवड कोठे करावी, हा गंभीर प्रश्न आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळ असे 18.75 कोटी वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. रेल्वे आणि वन विभागाकडे सर्वाधिक जागा असल्याने वन विभाग 7.29 कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट पार पाडले. मात्र, सामाजिक वनीकरणला शेतकऱ्यांच्या बांधावर 7.29 कोटी वृक्षलागवड केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतुक

राज्याच्या वृक्ष लागवड मोहिमेने देशात नाव गौरविले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्र हरितमय करण्यासाठी यंदा 33 कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविली जाणार असून, त्याकरिता आतापासून सुक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.


VIDEO:आदित्य ठाकरे विधानसभा लढवण्याची चर्चा, भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...