जिवापाड जपलेल्या बैलानेच घेतला मालकाचा जीव.. शेतकरी जागेवर ठार

पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बैलाने अचानक हल्ला केला. बैलाचे शिंग पोटात घुसल्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना बीड जिल्ह्यातील विडा गावात उघडकीस आली.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 11:04 PM IST

जिवापाड जपलेल्या बैलानेच घेतला मालकाचा जीव.. शेतकरी जागेवर ठार

बीड, 27 जुलै- पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बैलाने अचानक हल्ला केला. बैलाचे शिंग पोटात घुसल्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना बीड जिल्ह्यातील विडा गावात उघडकीस आली. अशोक उद्धवराव पवार असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

विडा गावापासून जवळच असलेल्या कनेर नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतामध्ये शेतीचे काम झाल्यानंतर बैलांना पाणी पाजताना अचानक एका बैलाने अशोक पवार यांच्यावर हल्ला केला. प्रतिकार करूनही बैलाने टोकदार शिंग पोटात घुसवले. शेजारील लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा बैल बाजूला झाला. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे पावर कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बैलाने शेतकरी मारल्याची माहिती या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.

..या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

पावसाळ्याचे तब्बल दोन महिने उलटले मात्र पाऊस पडत नाही. खत, बियाणाचा जुगार खेळला पीक जोमात पण पाऊस पडायचे नाव घेईना. शिवार सुकतोय दिवसेंदिवस परस्थिती बिकट होत चालली आहे. मागचे दिवस आणखी पुढे येतात की काय, या भीतीने केज तालुक्यातील वाघे बाबळगाव येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सज्जन महादेव घायाळ (वय- 42) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतीमध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मंदाकिनी सज्जन घायाळ व दोन मुले आहेत. एकीकडे मुंबईसह पुणे, कोकणात पावसाने थैमान घातले असताना मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अजून अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं नावच घेत नाही.

Loading...

VIDEO : पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, भाजपवरही केला आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2019 11:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...