एका व्हाॅटस्अॅप पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं झालं मुश्किल !

"एक काम करा ,आमच्या तिघणांही फाशी दया, नको हे जगन आमची मुलगी कुणाला देण्यापेक्षा आम्ही मरू"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 03:21 PM IST

एका व्हाॅटस्अॅप पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं झालं मुश्किल !

गोविंद वाकडे, पुणे

13 जुलै : सध्या अनेकजण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आपण सतत अॅक्टिव्ह राहण्याच्या नादात अशी काही पोस्ट टाकून मोकळे होतो, ज्यामुळे एखाद्याचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. पिंपरी चिंचवडच्या एका अंध कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागलंय.

"एक काम करा ,आमच्या तिघणांही फाशी दया, नको हे जगन आमची मुलगी कुणाला देण्यापेक्षा आम्ही मरू"

या अंध दाम्पत्याचा काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश आपल्याला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शहरातल्या लाल टोपी नगर झोपडपट्टीत राहणारं हे धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे दाम्पत्य. त्यांना एकुलती एक मुलगी. मुलीचा फोटो सोशल मीडियावर टाकून कुणीतरी प्रश्न उपस्थित केला, ही मुलगी या दाम्पत्याचीच आहे का?

लोखंडेंच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य..तरीही आपल्या मुलीला चांगलं शिक्षण द्यायची ही सामान्य आई बापासारखी यांचीही इच्छा. पण या पोस्टमुळे त्यांची परिस्थिती अवघडल्यासारखी झाली. अनेकांच्या विचित्र नजरेला त्यांना सामोर जावं लागतंय, ही अपहरण केलेली, चोरी केलेली मुलगी आहे का अशा प्रश्नांना सामोरं जातांना या दोघांना खुप त्रास होतोय.

Loading...

अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जरूर करावा पण आपण पोस्ट टाकल्याने कुणाचं आयुष्य तर उद्धवस्त होणार नाही ना याची काळजी घेण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...