आचारसंहितेपूर्वी फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका, उद्या होणार बैठक

आचारसंहितेपूर्वी फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका, उद्या होणार बैठक

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 निर्णय घेतले.

  • Share this:

मुंबई, 7 मार्च : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारने मंगळवारी तब्बल 22 निर्णय घेतले. त्यानंतर आता शुक्रवारी पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आहे. य़ामध्ये विद्यापीठीय शिक्षकांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव, भाड्याचे घर योजनेत 100 रुपये मुद्रांक शुल्क, 23 मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेतला. या बैठकीपूर्वी सकाळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमीपूजनाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतलेल्या विक्रमी निर्णयांनंतर शुक्रवारी होणाऱ्या बैठीत तब्बल 50 पेक्षा अधिक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने लोकप्रिय निर्णयांचा धडाका सुरू ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चला लागू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये विद्यापीठ शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आणि सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरास मंजूरी देण्यात आली. याशिवाय आपत्कालिन वैद्यकीय सेवेसाठी कौशल्य केंद्र, मोर्शी येथे मत्स्य महाविद्यालय, वैद्यकीय खरेदीसाठी समिती, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा सिंचन प्रकल्पासाठी 3 हजार 517 कोटी रुपयांच्या खर्चाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नागपूर, अमरावती, वर्धा येथे स्ट्रीट इस्टेटची स्थापना, अभयारण्य क्षेत्रातील पुनर्वसित कुटुंबांना दिलासा, मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या