कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

राज्यात 1 मार्च ते 30 मे या तीन महिन्यात 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील केवळ 188 शेतकरी पात्र ठरले असून 140 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 06:27 PM IST

कुणी बिडीमुळे तर कुणी दिवा पडल्यामुळे,शासन दरबारी मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

नागपूर, 14 जुलै : सरकारी कारभार किती निगरगट्ट असतो याची प्रचिती देणारी बाब समोर आलीये. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरताना सरकारी बाबूंनी लावलेले निकष चक्रावून टाकणारे तर आहेतच शिवाय संतापजनकही आहेत. राज्यात 1 मार्च ते 30 मे या तीन महिन्यात 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील केवळ 188 शेतकरी पात्र ठरले असून 140 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना मिळालेली मदत आकडेवारी काय?  यावर विधान परिषदेत हेमंत टाकले आणि सुनील तटकरे यांनी प्रश उपस्थित केला होता. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही धक्कादायक माहिती दिलीय.

2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

यात राज्यात 3 महिन्यात 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या करल्यात. त्यात 188 शेतकरी पात्र झाले असून 144 शेतकऱ्यांना मदत देण्यात आलीये. 122 शेतकरी अपात्र घोषित करण्यात आले असून 329 शेतकऱ्याच्या आत्महत्येची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.

राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!

तर यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोधन या एकाच गावात वर्षभरात 23 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची माहिती  चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिलीय. पण धक्कादायक म्हणजे यवतमाळ जिल्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सुरस कथा शासन दप्तरी नोंदण्यात आल्या आहेत.

Loading...

सरकारी दप्तरीही मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

1) मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या साळवेश्वरमध्ये माधव रावते यांनी चिता रचून आत्महत्या केली.

- शासन दप्तरी नोंद - माधव रावते कापसाच्या कांड्यांच्या ढिगाऱ्यावर बसून बिडी पित होते, यातून ठिणगी पडून रावतेचा मृत्यू

2) बोथबोधन येथे नागरणीचे पैसे नाकारल्याने सुंदरी चव्हाण यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली.

शासन दप्तरी नोंद -- सुंदरी बाई मुलाकडे आले असता झोपेत असताना अंगावर दिवा पडून मृत्यू

3) राजूरवाडी येथे शंकर चावरे याने पंतप्रधान याना जबाबदार धरत आत्महत्या केली

शासन दरबारी नोंद- अशा प्रकारची कुठलीही नोंद नाही,  चावरे यांनी आधी विष प्रश्न केले, नंतर फाशी घेतली पण दोर तुटला, मग रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...