Kamla Mill Fire Update : आगीला हुक्का पार्लरच जबाबदार, तज्ज्ञांच्या समितीने ठेवला ठपका

Kamla Mill Fire Update : आगीला हुक्का पार्लरच जबाबदार, तज्ज्ञांच्या समितीने ठेवला ठपका

लोअर परेलमधल्या कमला मिल परिसरात लागलेली आग हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा ठपका तज्ज्ञांच्या समितीने ठेवला आहे अशी एक्सक्लुझीव्ह माहिती 'सीएनएन न्यूज18' ला सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

विनया देशपांडे,मुंबई,ता.12 सप्टेंबर : लोअर परेलमधल्या कमला मिल परिसरात लागलेली आग हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा ठपका तज्ज्ञांच्या समितीने ठेवला आहे अशी एक्सक्लुझीव्ह माहिती 'सीएनएन न्यूज18' ला सूत्रांनी दिलीय. या आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने तीन तज्ज्ञांची समिती नेमली होती या समितीने आपला सीलबंद अहवाल न्यायालयात सादर केला. या अहवालात अनेक धक्कादायक निरिक्षणं नोंदविण्यात आली आहे.

30 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधल्या मोजो ब्रिस्टो पबमध्ये आग लागली होती.

त्यानंतर ही आग पसरली आणि त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. कमला मिल परिसर हा मुंबईतला वर्दळीचा भाग असून या परिसरात अनेक हाय प्रोफाईल बार आणि रेस्टॉरंट आहेत. त्याच्या बांधकामाबाबत अनेक आरोप होत असून अग्नी सुरक्षा आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही करण्यात येत होता.

इथल्या अनेक पबमध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये अवैध हुक्का पार्लर चालवले जात असल्याचा आरोपही होत होता त्यामुळे मुंबई हायकोर्टानं ही समिती नेमली होती. कमला मिलचा मालक आणि आगीला कारणीभूत ठेरललेल्या दोन रेस्टॉरंटच्या मालकांवरही या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

त्याचबरोबर राज्य सरकार आणि महापालिकेचे अधिकारी, इंजिनिअर्स यांनाही या समितीने दोषी धरलं असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोषी धरून शिक्षा करण्यात यावी अशी शिफारस या अहवालात करण्यात आलीय.

 

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 03:48 PM IST

ताज्या बातम्या