पाऊस परतल्याने बैल पोळ्याचा उत्साह वाढला

दुष्काळाचं सावट राज्यावर पसरलं होतं पण गेल्या दोन दिवसात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बैल पोळ्यासाठी बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 09:37 AM IST

पाऊस परतल्याने बैल पोळ्याचा उत्साह वाढला

 

21 ऑगस्ट: आज बैलपोळ्याचा सण आहे. शेतकरी बांधवांसाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा. दुष्काळाचं सावट राज्यावर पसरलं होतं पण गेल्या दोन दिवसात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बैल पोळ्यासाठी बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.

आज राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह आहे. सकाळपासूनच आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यास, सुरुवात झाली आहे. बीडमध्ये बैलपोळ्याची जय्यत तयारी पहायला मिळते आहे. पाऊस न पडल्याने शेतकरी राजा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. पण गेले 2 दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. आता पिकं जगतील त्यामुळे सर्जाराजाच्या कौतुकाचा आजचा दिवस बळीराजा उत्साहात साजरा करू शकतोय. तसंच भुसावळमध्येही बैलाचा साज खरेदी करण्यासाठी बाजारात बळीराजाने गर्दी केली होती.

बैल शेतकऱ्यांचा खरा सोबती असतो. वर्षभर तो शेतकऱ्यांसोबत राबत असतो. याच बैलाचा हा सण साजरा करण्याची परंपरा ग्रामीण भागात आहे.पण बैलपोळा साजरा करण्यास शहरातही हल्ली सुरु झाली आहे. बैल हे सामर्थ्याचे ,शक्तीचे प्रतीक आहे. बैलांनी भारताच्या राष्ट्रीय चिन्हातही स्थान मिळवलं आहे.

बैल पोळ्यानिमित्त ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनवलेल्या बैलाची मनोभावे पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकरी बैलांना सजावट करतात. दुपारी पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गावातून संध्याकाळी मिरवणूकही काढली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 09:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...