'नितेश राणेंनी चिखल फेकला मी तर अधिकाऱ्यांचे डोकेच फोडेन'

'ठेकेदाराने नाला दुरुस्त केला नाही तर याद राखा माझ्याशी गाठ आहे.'

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 08:07 PM IST

'नितेश राणेंनी चिखल फेकला मी तर अधिकाऱ्यांचे डोकेच फोडेन'

दिनेश केळुस्कर, कणकवली 7 जुलै: कणकवलीत हायवे आंदोलन पुन्हा  भडकण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घातल्याचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजतं आहे. हे प्रकरण ताजं असतानाच काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनीही आज ठेकेदाराला धमकीच दिलीय. ते म्हणाले, नितेश राणेंनी चिखल फेकला मी तर अधिकाऱ्यांचे डोकेच फोडेन असं सावंत यांनी म्हटलं आहे.

विजय सावंत यांच्या कणकवलीतील रामेश्वर प्लाझा या संकूलासमोरचा नाला हायवे ठेकेदाराने बुजवला आहे. त्यामुळे सावंत यांचे संकूल आणि परिसरात पाणी भरत आहे. याबाबत आज सावंत यांच्या सोबत हायवे विभागाच्या कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदारांनी  पोलीस सरंक्षणात या परिसराची पाहणी केली. त्यावेळी पोलीसांसमक्ष सावंत यानी हा इशारा दिलाय .

नितेश राणे यांच्या आंदोलनालाही सावंत यानी पाठींबा दिला असून येत्या तीन दिवसात हा नाला सुधारून देतो अस आश्वासन ठेकेदाराने सावंत यांना दिलंय. तसं झालं नाही तर पुन्हा एकदा कणकवलीत हायवे आंदोलन भडकण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी कोकेन घेतात, सुब्रम्हण्यम स्वामींच्या वक्तव्याविरुद्ध गुन्हा दाखल

अधिकाऱ्यांचं आंदोलन

Loading...

अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे.नितेश राणे यांना जामिन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, मात्र जरा जपूनच वापरा

नारायण राणे यांनी मागितली माफी

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...