270 कोटींची थकबाकी तरी राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांची महावितरणला 'दमदाटी'

270 कोटींची थकबाकी तरी राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांची महावितरणला 'दमदाटी'

इंदापूर उपविभागाची 178 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर वालचंदनगर उप विभागाने 299 रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.

  • Share this:

इंदापूर,29 ऑक्टोबर: इंदापूर तालुक्यातील वीजबीलं थकबाकी राहिल्याने शेतीपंपांच्या 1400 रोहीत्रांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे.  यामुळे वीज पुरवठा चालू करा नाही तर  आंदोलन तीव्र करू अशी दमदाटी  राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा महारूद्र पाटील यांनी  केली आहे.

हा वीज पुरवठा खंडीत केल्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसनं पंचायत समितीसमोर रास्तारोकोही केलं आहे.  थकीत वीज बिलं वसूल करण्यासाठी महावितरणने 1400 रोहित्रांना वीज पुरवणं बंद केलंय. इंदापूर उपविभागाची 178 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर वालचंदनगर उप विभागाने 299 रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. वालचंदनगर उपविभागाची 91 कोटी 97 लाख थकबाकी आहे. अशी दोनशे सत्तर कोटीची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई चालू आहे. तर दुसरीकडे रोहीत्रांचा वीजपुरवठा तातडीने चालू केला नाही तर या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 05:12 PM IST

ताज्या बातम्या