News18 Lokmat

पुण्यात इस्टेट एजंटची निर्घृण हत्या.. डोक्‍यात व खांद्यावर कोयत्याने केले वार

पुण्यातील कात्रजमध्ये एका इस्टेट एजंटची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजयकुमार सीताराम जैसवाल (वय-45, रा. कोथरूड) असं हत्या झालेल्या इस्टेट एजंटचं नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 12:53 PM IST

पुण्यात इस्टेट एजंटची निर्घृण हत्या.. डोक्‍यात व खांद्यावर कोयत्याने केले वार

पुणे, 21 मे- पुण्यातील कात्रजमध्ये एका इस्टेट एजंटची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजयकुमार सीताराम जैसवाल (वय-45, रा. कोथरूड) असं हत्या झालेल्या इस्टेट एजंटचं नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अजयकुमार जैसवाल यांच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने डोक्‍यात व खांद्यावर वार करून खून करण्यात आल्याचे आढळले.

भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाऊसवर ही हत्या करण्यात आला. हत्येनंतर आरोपींनी फार्म हाऊसचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि पसार झाले. दरम्यान, मालक फोन उचलत नसल्यामुळे शोध घेत नोकर फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पैशाच्या किंवा जमिनीच्या व्यवहारातून खून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

विवेक ओबेरॉयला महिला आयोगाची नोटीस,ऐश्वर्यावर ट्विट करणं भोवणार

अजयकुमार जयस्वाल हा घटस्फोटीत होता, तो कोथरुड येथे एकटाच रहातो. त्याचे सच्चाई माता डोंगर परिसरात एक छोटे फार्म हाऊस आहे. तो अधूनमधून येथे येत जात होता. दरम्यान त्याच्याकडे काम करणाऱ्या नोकराने घरी येऊन पाहिले असता दाराला कुलुप दिसले. मात्र त्याची गाडी बाहेर उभी होती. यामुळे त्याने खिडकी उघडत आत डोकावून पाहिले असता जयस्वाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

Loading...


VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...