इंजिनिअरिंगच्या एका विषयात नापास झाल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही गोष्ट गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2019 11:00 PM IST

इंजिनिअरिंगच्या एका विषयात नापास झाल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

अंबाजोगाई 2 जुलै : एका विषयात नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. गणेश तुकाराम कराड (वय २४) असं  विद्यार्थ्याचं नाव आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. आंबेजोगाई पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

गणेश हा पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही गोष्ट गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. याचं नैराश्यातून सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या त्याने आत्महत्या केली. यावेळी त्याचे आई-वडील हे गावाकडे शेतात गेले होते. यावेळी घरात कोणीच नसताना गणेशने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी त्याचे आई-वडील घरी परतल्यानंतर ही घटना उघड झाली. या आत्महत्ये मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशिममध्ये पुराच्या पाण्यात बहिण भाऊ वाहून गेले

मुंबईसह राज्यभरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईचं जनजीवन देखील ठप्प झालं. तर उर्वरित राज्यात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. वाशिमला देखील पावसानं झोडपून काढलं असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रोडवरील वाघी बुद्रूक गावाजवळ असलेल्या नाल्यावर काही मुलं खेळत होती. यावेळी जोरदार पावसामुळे नाल्याला अचानक पूर आला. या पुरात दोन मुलं वाहून गेली असून त्यांचा आता शोध घेतला जात आहे. बाळू पवार वय ( 14 वर्षे ) आणि पारस बाळू पवार ( 7 वर्षे ) अशी दोन मुलांची नावं आहेत. पुजा आठवीमध्ये कर पारस दुसरीमध्ये शिकत आहे. या घटनेनं गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...