लोणावळा डबल मर्डरचा पोलिसांकडे सुगावा ?

या प्रकरणात लैंगिक अत्याचार नाही, प्राथमिक पोस्ट मॉर्टेम अहवालात स्पष्ट झालं आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 03:30 PM IST

लोणावळा डबल मर्डरचा पोलिसांकडे सुगावा ?

अनिस शेख, लोणावळा

05 एप्रिल :  लोणावळ्यात एक मित्र आणि त्याच्या मैत्रिणीचा खून करण्यात आला आहे.  सार्थक वाकचौरे, श्रुती डुंबरे अशी त्यांची नावं आहेत. दोघांचीही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. मात्र, या खुनामागचं कारण अजूनही अनुत्तरीतच आहे. ही हत्या का झाली, त्यांचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलीस अजून मोकळेपणानं बोलायला तयार नाहीत. दरम्यान, या प्रकरणात लैंगिक अत्याचार नाही, प्राथमिक पोस्ट मॉर्टेम अहवालात स्पष्ट झालं आहे.

लोणावळ्यातल्या सार्थक आणि श्रुतीच्या खूनाबद्दल पोलीस पूर्ण माहिती देणं टाळत असले तरीही, हत्येच्या कारणांबाबत पोलीसांकडे काही ठोस माहिती असल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे. पण सध्या तरी पोलीस अधिकृतपणे माहिती देणं टाळतायत, सार्थक आणि श्रुतीची हत्या का झाली, ती कुणी केली, त्यात ऑनर किलिंग आहे असे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पण एक मात्र निश्चित हत्या एकापेक्षा जास्त जणांनी केल्याचं पोलीसांचं म्हणनं आहे.

3 एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपुर्वी लोणावळ्यातल्या एका डोंगरावर दुपारी दोन मृतदेह सापडले. त्यात एक मुलीचा होता तर दुसरा मुलाचा. नंतर हे दोघेही जण हे सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं उघड झालं. त्यात सार्थक हा नगर जिल्ह्यातला आहे तर श्रुती ही पुण्यातली. दोघेही जण शेवटच्या वर्षाला होते. त्यात श्रुतीची पुण्यातल्या एका कंपनीत प्लेसमेंटही झालेली. हे दोघेही जण शेवटचे रात्री साडे आठ वाजता एका मित्राला दिसल्याचं कळतंय पण नंतर त्यांचे मृतदेहच सापडले. त्यांचा खून करण्यात आल्याचं उघड झालंय. पोलीसांकडे त्याचा सुगावाही आहे.

सार्थक आणि श्रुती हे फक्त मित्र होते  की त्यांच्यात प्रेमसंबंधही होते याबाबतही काही उघडपणे सांगितलं जात नाहीय. दोघांचा खून होण्यामागे सध्या तरी वेगवेगळ्या शक्यतांचा पोलीस तपास करतायत..त्यात

Loading...

शक्यता क्रमांक-1 चोरी?

श्रुती आणि सार्थक ह्या दोघांचेही मोबाईल गायब आहेत. बाकी इतर सगळं सामान त्यांच्या मृतदेहाजवळच सापडलं. त्यामुळे चोरीसाठी त्यांचा खून केला गेला असावा अशी एक शक्यता वर्तवण्यात येतेय.

शक्यता क्रमांक-2 लव्ह ट्रायंगल ?

सार्थक आणि श्रुती यांच्यात प्रेमसंबंध असावेत आणि त्या प्रेमाला तिसरा कोणही असावा अशी शक्यताही वर्तवली जातेय. त्यातून मग सार्थक आणि श्रुतीचा खून झाला का याचाही पोलीस तपास करतायत.

शक्यता क्रमांक-3 ऑनर किलिंग ?

प्रेमसंबंधात जात ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेपायी सार्थक आणि श्रुतीचा खून केला गेला असावा का याचाही पोलीस तपास करतायत

शक्यता क्रमांक-4 बलात्कार आणि खून

सार्थक आणि श्रुती हे फिरायला आलेले असताना तिथं दोघं तिघं आले असावेत आणि मग श्रुतीवर अतिप्रसंग करून दोघांचाही खून केला का याचाही पोलीस तपास करतायत..

पोलीस या सगळ्या शक्यतांचा तपास करतायत. त्यासाठी आठ पथकं तयार करण्यात आलेत. सायबर सेलचीही मदत घेतली जातेय. सार्थक आणि श्रुतीच्या डोक्यात जबर मारहाण झाल्यामुळेच त्यांचा जीव गेल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. पण श्रुतीचा मृतदेह हा बांधलेल्या अवस्थेत सापडलाय. त्यात मारेकरी एकापेक्षा दोन असल्याचं पोलीसांनीच सांगितलंय. त्यामुळे बलात्कार करून खून तर केला गेला नाही ना याचीच शक्यता जास्त बळावतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...