इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले हे कारण...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिले हे कारण...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने गळफाल घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे घडली आहे.

  • Share this:

अमोल गावंडे(प्रतिनिधी)

बुलडाणा, 24 जुलै- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने गळफाल घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे घडली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षेमध्ये अपयश आल्याने जीवन संपवत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. वैभव डहाळके (वय- 21) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

अभियांत्रिकीच्या  परीक्षेमध्ये अपयश आल्याने चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटीच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या वैभवने आपल्या खोलीच्या छताला असलेल्या हुकला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी वैभवने सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे. त्यातही त्याने परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैभव हा मूळचा लोणार तालुक्यातील विरुपांगरा येथील रहिवासी होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. तर चिखली येथे राउतवाडी भागात मित्रांसोबत खोली करून अभियांत्रिकीमध्ये शिकत होता. नुकताच  त्याचा प्रथम वर्षाचा निकाल लागला. त्यात तो नापास झाल्याने त्याला नैराश्य आले होते. मंगळवारी सकाळी त्याचे मित्र नेहमीप्रमाणे कॉलेजला गेले. वैभव गेला नाही. मित्रांना त्याने नंतर येतो म्हणून सांगितले. वैभव कॉलेजला का आला नाही म्हणून खोलीवर जाऊन पाहिले असता वैभवने छताच्या हुकला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैभवच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोटही आढळली. 'परीक्षेत नापास झाल्याने आपण आत्महत्या करत आहोत,... आई, बाबा आणि ताई मला माफ करा', असा उल्लेख आहे. पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सलमानचा प्रेमळ अंदाज, आईसोबत डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 06:01 PM IST

ताज्या बातम्या