धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

आज कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारच्या विरोधात निघालेली निर्धार परिवर्तन रॅली आहे. पुढच्या काही वेळात कोल्हापुरातील कागल इथं राष्ट्रवादी कीँग्रेसची जाहीर सभा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2019 12:22 PM IST

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

बीड, 28 जानेवारी : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटलं आणि त्यानंतर त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वाऱ्याचा उलट वेग असल्याने हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

आज कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारच्या विरोधात निघालेली निर्धार परिवर्तन रॅली आहे. पुढच्या काही वेळात कोल्हापुरातील कागल इथं राष्ट्रवादी कीँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अजित पवार, छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार होते. पण कदाचित या सभेसाठी मुंडे आणि भुजबळ वेळत न पोहचण्याची चिन्ह दिसत आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात 4 ठिकाणी सभा होणार आहेत. त्यामध्ये कागल नंतर मुदाळ तिठा, कोल्हापूर शहर आणि जयसिंगपूर शहरात सभा होईल.  त्यानंतर आज रात्रीच ही परिवर्तन यात्रा सांगली जिल्ह्यात जाणार आहे.

उद्या म्हणजेच मंगळवारी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रांच्या जाहीर सभा होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या ठिकाणीच सभा आयोजित केल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे सगळे नेते सरकारवर काय टीका करणार याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे.


Loading...

VIDEO: दोरीने बांधून भल्या मोठ्या ऊंटाला केली बेदम मारहाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...