'स्वरंग'सह विविध रंग उधळणारा मुंबईकरांचा लोकप्रिय 'एलिफंटा महोत्सव' आजपासून

'स्वरंग'सह विविध रंग उधळणारा मुंबईकरांचा लोकप्रिय 'एलिफंटा महोत्सव' आजपासून

सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला 'एलिफंटा महोत्सव' यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी एलिफंटा अर्थात घारापूरीच्या बेटांवर होत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून- सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला 'एलिफंटा महोत्सव' यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी एलिफंटा अर्थात घारापूरीच्या बेटांवर होत आहे. 'स्वरंग" ही यंदाच्या सोहळ्याची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे ही माहिती दिली. सर्व कला आणि पर्यटन प्रेमींनी महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शनिवारी (1 जून) सायंकाळी 6 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक कैलास खेर यांचा 'शिवआराधना' या विषयावरील सुराविष्कार या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल.

रविवारी (2 जून) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घारापुरीच्या बेटावर शिल्प आणि लेण्यांचे दर्शन घडवणारा हेरिटेज वॉक होणार आहे. शिवतांडव, योगमुद्रा, शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन शिल्प, लेण्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करता येणार आहे. दिव्यांग संस्था आणि अनाथाश्रमातील सदस्यांना लेण्यांची सफर घडवली जाणार आहे.

रविवारी (2 जून) सायंकाळी 7 वाजता घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत आणि चित्रकलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार निलेश जाधव, शील कुंभार आदी कलाकार हे शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार लाइव्ह सादर करणार आहेत.

मुंबई शहरानजीक दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवास देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. यंदाही या महोत्सवामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. रावल यांनी केले आहे.

1500 वर्षांपेक्षा देखील जास्त वर्षे जूना असा इतिहास आपल्या लेण्यांमध्ये सामवालेला घारापुरी जो एलिफंटा केव्हजच्या नावाने जागतिक पुरातन विभागात नावजलेले हे ठिकाण पाहण्याचा ही एक नामी संधी मानली जाते. जिथे एकाचवेळी तुम्हाला या ठिकाणाचा इतिहास ,वैभव आणि नवे रूप पाहायला मिळणार आहे.

या उत्सवाची सुरुवात सुप्रसिद्ध गेट वे ऑफ इंडियापासून होणार आहे. यासाठी खास पाहुण्याना निमंत्रित करण्यात आले आहे. गायक कैलाश खेर आणि शंकर महादेव यांच्या सुंदर गीतांनी होणार आहे. आजुबाजुने समुद्र, इतिहासाच्या खुशीत, सुप्रसिद्ध ठिकाण तिथे असलेली रम्य संध्याकाळ थंडगार वाहणारे वारे आणि सोबतीला सुंदर अशा सुप्रसिद्ध गायकांची मैफिल...महाराष्ट्रचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमात अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.


रविवारी सुटीच्या दिवशी एलिफंटा लेण्यांमध्ये या अविस्मरणीय कार्यक्रमाची सुरुवात हेरिटेज वॉकने होणार आहे. जिथे तुम्हाला एलीफंटा त्याचा इतिहास आणि त्याचे वैभव अगदी जवळून अनुभवायला मिळणार आहे.सोबत प्रसिद्ध मराठी रंगकर्मी स्वप्निल बांदोडकर आणि गायिका प्रियांका बर्वे यांच्यासोबत अनेक कलाकार नृत्य ,नाट्य, राग रंग आणि संगीत यांचे लाइव्ह दर्शन घडवणार आहेत. इतकेच नव्हे तर वरिष्ठ रंगकर्मी अच्युत पालव ,चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार नीलेश जाधव आणि शेर जाधव हे आपल्या चित्रकलेद्वारे उत्सवात रंगाची उधळण करतील. संगीत नाट्य आणि चित्रकला यांची त्रयी स्वरंग तुम्हाला खूप आठवणीचे क्षण देणार आहेत. पर्यटन विभागाच्या सचिव विनीता वेद सिंघल, पर्यटन संचालक दिलीप गावडे आणि व्यवस्थापकिय संचालक अभिमन्यु काळे, अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी उत्सवाला यशस्वी करण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी अथक परिश्रम केले आहे. विशेष म्हणजे या जगप्रसिद्ध उत्सवात सामिल होण्यासाठी तुम्हाला प्रवेश निशुल्क आहे.


SPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या