S M L

'हत तिच्या' ! हत्तीच्या मागे धावले कोल्हापूरकर

गावात आलेला हत्ती पळवून लावण्याची वनविभागाची मोहिम पहायला काल आजऱ्यात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. हत्ती त्याच्यामागे वनविभागाचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे उत्सुकतेने धावणारे बघे यांचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 19, 2017 10:58 AM IST

'हत तिच्या' ! हत्तीच्या मागे धावले कोल्हापूरकर

आजरा, 19 ऑगस्ट: 'हत्ती इलो रे' हे वाक्य कोकणात सुप्रसिद्ध आहे . पण हे वाक्य काल कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा येथे पाहायला मिळालं. गावात आलेला हत्ती पळवून लावण्याची वनविभागाची मोहिम पहायला काल आजऱ्यात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. हत्ती त्याच्यामागे वनविभागाचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे उत्सुकतेने धावणारे बघे यांचा एक व्हिडीओही व्हायरल झालाय.

आजरा शहरात पश्चिमेकडील मंजिरी परिसरात मुस्लिम दफनभूमी आहे. तेथे शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून एक टस्कर हत्ती नासधूस करत होता. त्यातच आजऱ्याचा आठवडी बाजार असल्याने शुक्रवारी गावात गर्दी होती. हत्ती दफनभूमीत असल्याची माहिती मिळताच, नागरिकांनी त्या परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान हत्तीला आवरण्यासाठी वन खात्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पण हत्ती काही हातात येईना मागे बघ्यांचाच लोंढा निर्माण झाला. हत्ती आला, हत्ती आला अशी चर्चा करत सगळं गावचं लोटलं. त्यामुळे हत्तीला हलावण्यात अडथळे येत होते.

वन खात्याचे अधिकारी फटाके वाजवून हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न करत असून अजूनही या हत्तीचा तळ आजऱ्याजवळच आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडामध्येही 4 दिवसांपूर्वी हत्तीच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 10:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close