कानडी हत्तींचा सिंधुदुर्गात धुमाकूळ

आता पुन्हा एकदा कर्नाटकमधून आलेल्या हत्तींनी दोडमार्ग तालुक्यातल्या अनेक गावात शेतकऱ्यांच्या माडबागायती आणि फळबागांचं अतोनात नुकसान केलंय .

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2017 12:27 PM IST

कानडी हत्तींचा सिंधुदुर्गात धुमाकूळ

दिनेश केळुस्कर, 19 जुलै : पंधरा वर्षं झाली पण जंगली हत्तींच्या आक्रमणातून सिंधुदुर्गाची काही सुटका होताना दिसत नाहीय. आता पुन्हा एकदा कर्नाटकमधून आलेल्या हत्तींनी दोडमार्ग तालुक्यातल्या अनेक गावात शेतकऱ्यांच्या माडबागायती आणि फळबागांचं अतोनात नुकसान केलंय. इतकंच नाही तर माणसांवर देखील हे हत्ती चाल करून येऊ लागलेयत.

बाबर्डे इथल्या शेतकरी असलेल्या यशोदा गवस म्हणतात, ' खत घालून पाणी घालून वाढवलंय. आता चार फळा गावली आसती . हत्तीनी नुकसान केल्यानी काय करणार? डोळ्यादेखत माड पडतत. त्यादिवशी माकाच मारून टाकणार होतो. एकादशी दिवस म्हटला फिरान येवचा माडातसून पाठीमागे हत्ती होतो तो मी बगूक नाय. माड पाडीत होतो. आवाज इलो दणकन तेव्हा पाटी बगलंय. व्हाळात जावन पडलय. माका धावाक जमता ?'

गेल्या सव्वा वर्षापासून पुन्हा एकदा सात हत्तींचा कळप दोडामार्ग परिसरात नुकसान करतोय.

हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई म्हणतात, ' मार्च 2016 पासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांची 56 लाखांची नुकसानी केली . हा शासकीय आकडा आहे. नुकसानीच बाजूला जाउदे पण ही माझ्या मागे बागायती  आहे ना, पंचवीस पंचवीस वर्षाचे माड आहेत. रातोरात उद्ध्वस्त होतायत. दररोज शासनाकडे भांडतोय कारण जसा माड पडतोय तसा माझा शेतकरी मरतोय.'

Loading...

संध्याकाळ होताच इथल्या शेतकऱ्यांच्या मनात  हत्तीच्या भीतीने धडकी भरतेय . कारण बागायतीच नुकसान सोडाच हत्ती आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेयत .

हेवाळे गावचे ग्रामस्थ आनंद शेटकर म्हणतात, 'संध्याकाळी सहा वाजले की जी आजूबाजूला शेतीकामासाठी गेलेली असतात. येईपर्यंत कुणाचा जीव थाऱ्यावर नसतो. रात्रीच्या वेळी मंदिरात भजन असतं. गाव आराखड्याची मीटिंग असते. एकटं जाण्याचं धाडसच उरलेलं नाही.

वनविभागाने हत्तीना हटवण्यासाठी आत्तापर्यंत अनेक मोहिमा राबवल्या. यात काही हत्तींचा मृत्यूही झाला. हत्तींच्या हल्ल्यात काही माणसांचेही बळी गेले. बारा तेरा कोटी खर्च झालेत. पण हत्तीचा प्रवेश रोखण्यात वनविभागाला सपशेल अपयश आलंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल  झालेयत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...