S M L

कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ, 40 लाख शेतकऱ्यांना फटका

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा हा निर्णय आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 08:41 AM IST

कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ, 40 लाख शेतकऱ्यांना फटका

20 एप्रिल :  राज्य सरकारने कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ केल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक बोजा पडला आहे. याचा 40 लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नसताना कर्जाखाली अगोदरच दबून गेलेला आहे. हे कमी म्हणून की काय, आता तर महावितरणनं चक्क शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या वीजदरात चक्क अडीच पटीनं वाढ केली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा हा निर्णय आहे. या दरवाढीचा फटका जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना बसणार आहे.शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा बोजा आहे. यामध्ये सरकारने सवलतीच्या दरांबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 08:41 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close