Elec-widget

भाजीविक्रेत्याचं वीजबील 8 लाख; 'शॉक'ने केली आत्महत्या!

भाजीविक्रेत्याचं वीजबील 8 लाख; 'शॉक'ने केली आत्महत्या!

8 लाख 65 हजार 20 रूपये! वीजेच्या बिलावरचा हा आकडा पाहिल्यानंतर हे एखाद्या अवाढव्य कारखान्याचा वीजबील वाटेल. मात्र झोपडीवजा घरात राहणारे औरंगाबादमधले किरकोळ भाजी विक्रेते जगन्नाथ शेळके हे वीजबील आहे.

  • Share this:

10 मे: आतापर्यंत वीजेच्या धक्क्यानं अनेकांचे प्राण गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र औरंगाबादमध्ये वीजेच्या बिलाच्या धक्क्यानं एका भाजीविक्रेत्याला प्राण गमवावे लागले आहेत. महावितरणचा अक्षम्य हलगर्जीपणा यामुळे चव्हाट्य़ावर आला आहे.

8 लाख 65 हजार 20 रूपये! वीजेच्या बिलावरचा हा आकडा पाहिल्यानंतर हे एखाद्या अवाढव्य कारखान्याचा वीजबील वाटेल. मात्र झोपडीवजा घरात राहणारे औरंगाबादमधले किरकोळ भाजी विक्रेते जगन्नाथ शेळके हे वीजबील आहे.

महावितरणच्या या हलगर्जीपणानं त्यांच्याच ग्राहकाचा जीव घेतलाय. अवाजवी वीज बिलाचा धसका घेऊन जगन्नाथ शेळके यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे.भाजी विक्री करून संसारगाडा हाकणाऱ्या जगन्नाथ शेळके यांनी काही दिवसांपू्र्वीच वीज मीटर बदलला होता.

महावितरणने त्यांची तांत्रिक चूक मान्य करून एका कर्मचाऱ्याला निलंबीत केलंय. मात्र या कारवाईनं जगन्नाथ शेळके यांचा गेलेला जीव थोडाच परत येणार आहे?पोलिसांनी तुर्तास जगन्नाथ शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतलीय.

आतापर्यंत वीजेच्या धक्क्यानं अनेकांचे प्राण गेलेत. मात्र जगन्नाथ शेळके यांना अवाजवी वीज बिलाच्या धक्क्यानं प्राण गमवावे लागलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...