यवतमाळमध्ये भावना गवळी नकोत, शिवसेना-भाजप आमदारांची मागणी

भावना गवळी शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून हा उमेदवार बदलावावा अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 04:25 PM IST

यवतमाळमध्ये भावना गवळी नकोत, शिवसेना-भाजप आमदारांची मागणी

अक्षय कुडकिलवार, प्रतिनिधी, मुंबई 12 मार्च  : ऐकेकाळी काँग्रेसचा गढ असलेल्या यवतमाळमध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी विजयाची हॅट्रीक केली. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकिट मिळू नये यासाठी  शिवसेना आणि भाजपचे खासदार एकवटले आहेत. निवडणुका आल्या की सर्वच पक्षात मतभेद उफाळून येत असतात.

यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना तिकीट मिळू नये यासाठी शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळही घातली आहे. त्यांना भाजपच्या आमदारांचाही पाठिंबा मिळतो आहे. भाजप आमदार आणि राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी आणि संजय राठोड यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे भावना गवळी नको असं साकडं घातलं.

भावना गवळी शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी  मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून हा उमेदवार बदलावावा अशी मागणी  या नेत्यांनी केली आहे.

यवतमाळ-वाशिम

शिवसेनेच्या भावना गवळी या मतदार संघाच्या खासदार आहेत. या मतदारसंघात यवतमाळच्या चार आणि वाशिमच्या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव आणि वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि कारंजा या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. फेररचनेच्या आधी हा फक्त वाशिम मतदारसंघच होता. नंतर त्यात यवतमाळही जोडण्यात आला.

Loading...

मतदार

एकूण मतदार – 1755292

पुरुष – 52.49 टक्के

महिला – 47.51 टक्के

2014 मध्ये काय झालं

भावना गवळी,शिवसेना - 477905

शिवाजीराव मोघे,काँग्रेस – 384089

बाळ राठोड, बसपा - 48981

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...