बदलापूर, 27 जुलै: मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये 1500 प्रवासी अडकले आहेत. प्रवाशांनी बाहेर पडू नये सुरक्षित रहावं असं आवाहन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एनडीआरएफची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन हेलिकॉप्टरसही बचावकार्यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात आले आहेत.