एकनाथ खडसेंची एसीबी कार्यालयात हजेरी, मालमत्तेची दिली माहिती

एकनाथ खडसेंची एसीबी कार्यालयात हजेरी, मालमत्तेची दिली माहिती

खडसेंनी आपल्या मालमत्तेची माहिती एसीबीकडे सादर केली.

  • Share this:

नाशिक, 10 एप्रिल : एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे आज अँटी करप्शन कार्यालयात हजर झाले. खडसेंनी आपल्या मालमत्तेची माहिती एसीबीकडे सादर केली.

एमआयडीसीतल्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीचा ससेमिरा संपत नाही तोच एकनाथ खडसेंमागे नव्या प्रकरणाच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलाय. एकनाथ खडसेंनी आज नाशिकच्या  लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावली.

आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंविरोधात अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

एकनाथ खडसेंनी आज नाशिकच्या  अँटीकरप्शन कार्यालयात दाखल झाले. त्यांनी  तपास यंत्रणांना मालमत्तेची कागदपत्रं सादर केली आहेत. एसीबीकडून खडसेंच्या मालमत्तेचा तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 06:37 PM IST

ताज्या बातम्या