होमग्राऊंडवरच भाजपकडून खडसेंची कोंडी

एकनाथ खडसेंना जिल्हा परिषद सभापतीच्या निवडणुकीत डावलल्यानं खडसे चांगलंच संतापले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2017 06:21 PM IST

होमग्राऊंडवरच भाजपकडून खडसेंची कोंडी

01 एप्रिल : भाजप नेते एकनाथ खडसे पक्षात कमालीचे नाराज असल्याचं समोर येतंय. विकास कामावरून सरकारला धारेवर धरले होते. आज जिल्हा परिषदेत डावलल्याने खडसे चांगलेच संतापले.

जळगाव जिल्हा उन्हाचा पारा चढलेला असताना जिल्हा परिषदेतच राजकारण तापल्याची भर पडली.  भाजपचे एकेकाळचे सर्वेसर्वा एकनाथ खडसेंना आज (शनिवारी) जिल्हा परिषद सभापतीच्या निवडणुकीत डावलल्यानं खडसे चांगलंच संतापले.

काँग्रेस अरुणा रामदास पाटील यांना सभापतीपद मिळावं हा आग्रह खडसे गटाने लावून धरला. पण पक्षाने विशेषतः गिरीश महाजन गटाने धुडकावून लावला होता. यामुळे खडसेंनी थेट पक्षाध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली. आणि टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराच पक्षाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यानंतर प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात बैठक झाली. या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर पक्षाने जे उमेदवार जाहीर केले त्यांच्याच नावाबर शिक्कामोर्तब होईल हा निर्णय घेण्यात आला.

जर टोकाचा विरोध झालाच तर मतदान घ्या असा निर्णय पक्षाने दिला. या निर्णयानंतर खडसे गटाने अरुणा पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.  त्यानंतर प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, राजनी चव्हाण, पोपट भोळे हे बिनविरोध निवडून आलेत. या सर्व घडामोडीनंतर एकनाथ खडसे काय भूमिका घेतात या कडे सर्वांचं लक्ष लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...