कल्पना इनामदार यांच्यामागे एकनाथ खडसेंचा हात - अंजली दमानिया

कल्पना इनामदार यांच्यामागे एकनाथ खडसेंचा हात - अंजली दमानिया

जली दमानियांवर आरोप करणाऱ्या समाजसेविका कल्पना इनामदार यांच्यामागे एकनाथ खडसे यांचा हात आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

  • Share this:

19 एप्रिल : अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांच्यामधलं आरोप-प्रत्यारोपाचं नाट्य संपताना दिसत नाहीय. अंजली दमानियांवर आरोप करणाऱ्या समाजसेविका कल्पना इनामदार यांच्यामागे एकनाथ खडसे यांचा हात आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर नवे आरोप केलेत. कल्पना इनामदार यांनी अण्णा हजारेंनाच्या आंदोलनाला पैसा पुरवला असा आरोप देखील दमानियांनी केलाय. खडसेंच्या विरोधात पवित्रा घेतला म्हणून 22 गुन्हे दाखल करून छळण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे

मी याबाबत लेखी तक्रार केली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यावर 1 महिन्यात चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी नीटपणे झाली नाही तर न्यायालयात याचिका दाखल करणार असंही दमानिया म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मला धमक्या आल्या पण पोलीस कारवाई झाली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 07:30 AM IST

ताज्या बातम्या