विधानसभेतला मी सगळ्यात भ्रष्ट आणि नालायक आमदार? - खडसे

विधानसभेतला मी सगळ्यात भ्रष्ट आणि नालायक आमदार? - खडसे

भ्रष्ट, नालायक, चोर उच्चका सदस्य असल्याचा डाग मला नको आहे. स्पष्टीकरण देताना खडसे गहिवरले.

  • Share this:

मुंबई 2 जुलै : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षात सध्या एकटे पडले आहेत. मुख्यमंत्र्यांशी पंगा घेणं त्यांना चांगलंच महागात पडलं. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नंतर दाऊद इब्राहिम सोबत त्यांचे संबंध असल्याचेही आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते बाजूला फेकले गेले. अखेरच्या विस्तारातही त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही. त्यांनी आपल्या मनातली खदखद आणि वेदना अनेकदा बोलून दाखवली. मंगळवारी सभागृहात बोलताना पुन्हा एकदा त्यांची ही व्यथा प्रगट झाली.

खडसे म्हणाले, माझ्या जीवनात एकही निवडणूक मी हरलो नाही. 40 वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप, प्रत्यारोप सभागृहात होतच असतात. पण विरोधी पक्षनेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे. विधानसभेतल्या 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज आहे उभा आहे अशी खंत त्यांनी आपल्यावरच्या आरोपांचा आधार घेत व्यक्त केली.

'कॅग'ने केली मुंबई महापालिकेचे 'पोलखोल', ओढले हे ताशेरे

दाऊदची बायको का बोलेल?

सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केलेत. दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याची संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झाले नाही. याचं मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं. मात्र नुकसान जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं.

खडसे गहिवरले

एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचं पालन करूनही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली. अँटी करप्शन कडून दोनदा चौकशी झाली, इन्कम टॅक्सची घरी रेड झाली. माझ्या बायका पोरांना चौकशीसाठी नेण्यात आलं. मी जमीनदाराचा मुलगा आहे. माझा शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही हे सांगताना ते गहिवरले.

मुंबईकरांनो, धोका अजून टळला नाही; हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

मला भ्रष्टाचाराचा डाग नको

संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करून एकही अपसंपदा नाही असं चौकशीतून स्पष्ट झालं. एकही शैक्षणिक संस्था नाही, कारण डोनेशन घेण्याचा दमच कधी नव्हता. मी शेवटच्या दिवशी यासाठी उभा आहे कारण हा भ्रष्ट, नालायक, चोर उच्चका सदस्य म्हणून या सभागृहातून मला जायचं नाहीये. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.

शेतीच्या वादातून सख्या भावाने केला बहिणीवर शस्त्राने हल्ला

खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा करा

आरोप करून एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा. विनापुरावे आरोप करणारा व्यक्ती आज घरी आहे, काय न्याय आहे या राज्यात? कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये. यापेक्षा वाईट कोणाच्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही.  काही चुकीचं बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो असं सांगत त्यांनी आपलं भाषण संपवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या