माझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 11:13 PM IST

माझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे

28 डिसेंबर : 'माझ्या मनात काय आहे हे मी अजित पवारांच्या कानात सांगितलंय' असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवलाय. तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं अजित पवारांनी सांगितलंय.

भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जळगावात एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होतं आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसाचं. या कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यासह ईश्वर जैन, गुलाबराव देवकर, शिरीष चौधरी, अरूण गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, डॉक्टर सुधीर तांबे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला होता. त्यांच्या या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर अजित पवारांसोबत एकत्र आल्यामुळे ते काय बोलता याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होते.

'नाथाभाऊ भाजपात या'

राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी भर व्यासपीठावरच नाथाभाऊ आमच्या पक्षात या, तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे असं जाहीर आवाहन दिलं.

Loading...

'माझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे

त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की,  40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक प्रलोभनं आली. पण पाटील अण्णा (सतीश पाटील) जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाहीये, माझ्या मनातील काय आहे हे मी अजित पवारांच्या कानात सांगितलंय असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट करताच सभागृहात एकच हश्या पिकली.

'राजकारणात कायम कुणाचा शत्रू नसतो -अजित पवार

तर काही सोहळे असे असतात की ज्यामध्ये जिथे राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र यायचं असतं. आम्ही काही कुणी कायमचे शत्रू किंवा मित्र नाहीये असं अजित पवार म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेनंही हे लक्षात घ्यावं, राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. दिवस बदलत असतात, चढउतार येत असतात आणि राजकीय समिकरणं बदलत असतात असं म्हणत अजित पवारांनी नव्या राजकीय वादळाचे संकेत दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 10:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...