जळगाव, 31 मार्च : जळगावातील जाहीर कार्यक्रमात भाजपचे नेते एकनाथ खडसेंनी शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. त्याठिकाणी भाजपचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे यावेळी जे खडसेंना सुचलं ते इतर नेत्यांना का सुचलं नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय.
याच कार्यक्रमानंतर शरद पवार आणि खडसे यांच्यात एकातांत 10 मिनिटे चर्चाही झालीय.या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
शुक्रवारी जैन हिल्सवर आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार उच्च कृषितंत्र पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना आमदार खडसे यांचे आगमन झाले होते. त्यानंतर शरद पवार भाषण करून परत येत असताना खडसे उठून उभे राहिले. आणि पवार जवळ येताच खडसेंनी त्यांना नमस्कारही केला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा