18 एप्रिल : जळगाव दिवाणी न्यायालयात एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरूध्द 5 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे या दोघांनाही 29 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कोणतेही पुरावे नसताना पॉलीहाऊसचं अनुदान एकाच दिवशी लाटलं शिवाय मुक्ताईनगर सूत गिरणीसाठी 161 कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप खडसेंवर केला होता. वास्तविक सूतगिरणीसाठी फक्त 20 कोटी रुपयांचे अनुदानचं मिळालं होतं. त्यामुळे खडसेंनी गुलाबरावांवर अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. तर या प्रकरणी न्यायालयाचा मध्यस्थीचा प्रयत्न आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा