अशा मंत्रिपदावर मी लाथ मारीन-एकनाथ खडसे

अशा मंत्रिपदावर मी लाथ मारीन-एकनाथ खडसे

पुण्याच्या जागर ग्रुपनं एका समारंभात एकनाथ खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केलंय. यावेळी केलेल्या भाषणात खडसेंनी आपली खंत, दु:ख व्यक्त केलंय.

  • Share this:

पुणे, 16 सप्टेंबर : पुण्याच्या जागर ग्रुपनं एका समारंभात एकनाथ खडसे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केलंय. यावेळी केलेल्या भाषणात खडसेंनी आपली खंत, दु:ख व्यक्त केलंय. ते म्हणाले, 'हे मरणापेक्षा वाईट मरण मी गेले 2 महिने अनुभवलंय. मी अशा मंत्रिपदावर लाथ मारतो.'

खडसेंनी सांगितलं, मी लोकांच्या ताकदीवर तरलो. आज मुंडे असते तर राज्याचं राजकारण वेगळं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

गेले दोन महिने एकनाथ खडसेंना त्यांच्याच पक्षातून होणारा विरोध आणि त्याचा राग त्यांच्या भाषणातून व्यक्त होत होता. 'आपण 40 वर्ष पक्षाची सेवा केली. 40 वर्षात 8 मुख्यमंत्र्यांवर कडक प्रहार केले. पण यावेळचा अनुभव आतापर्यंत आला नव्हता,'असंही ते कुणाचं नाव न घेता म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 03:32 PM IST

ताज्या बातम्या