खडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर

जळगाव मनपा निवडणुकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या आवाजातली एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच गाजतेय.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2018 01:56 PM IST

खडसेंच्या आवाजातली ऑडिओ क्लिप VIRAL, भाजपातले वाद पुन्हा चव्हाट्यावर

जळगाव, 30 जुलै : जळगाव मनपा निवडणुकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या आवाजातली एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच गाजतेय. पण ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं स्वतः खडसेंनी स्पष्ट केलं आहे. या क्लिपमधून खडसे मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचं आढळून आलं. पण आपल्याला पक्षाकडून अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप बनवण्याचे कोणतेही आदेशच आले नसल्याने तो आवाज आपला नाहीच, असा दावा खडसेंनी केलाय. पक्षाने मनपा निवडणुकीची सर्व जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवल्याने खडसे नाराज असल्याचं बोललं जातं आहे. अशातच हे बनावट ऑडिओ क्लिपचं प्रकरण समोर आल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान, आपल्या बनावट आवाजाची अशा पद्धतीने क्लिप बनवून ती मतदारांमध्ये व्हायरल करणे, ही मतदारांची शुद्ध फसवणूक असल्याचंही खडसेंनी म्हटलंय. ते यासंदर्भात पोलिसात तक्रारही दाखल करणार आहेत.

पण दरम्यान, ही ऑडिओ क्लिप  माझी नसल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. पण जळगाव मनपा निवडणुकीत मी 24 प्रचारसभा घेतल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. पाहुयात खडसे नेमकं काय म्हणालेतच...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close