एकनाथ खडसे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू असताना आता थेट खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पोहोचले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 06:41 PM IST

एकनाथ खडसे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर

28 डिसेंबर : मागील काही काळापासून भाजप सरकारवर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू असताना आता थेट खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पोहोचले आहे. डॉ सतीश पाटील यांच्या गौरव कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकाच व्यासपीठावर आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला  गिरीश महाजन यांनी दांडी मारलीये.

जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालय प्रांगणात आमदार डॉ सतीश पाटील यांच्या गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित आहे. पाटील राष्ट्रवादीचे असल्यानं अजित पवार यांच्यासह,अरुणभाई गुजराती हे आहेतच, मात्र राष्ट्रवादीच्या या नेत्यांसोबत, एकनाथ खडसे यांची उपस्थिती महत्वाची मानली जातेय.

एकमेकांत विस्तव न जाणारे आणि कायमंच कुरघोडीचं राजकारण करणारे नेते हे एकाच व्यासपीठावर असल्यानं या कार्यक्रमात कोण-कोणाला कोपरखळी मारतं याचीच चर्चा जोरदार रंगली असली तरी एकनाथ खडसे आणि अजित पवार नेमकं काय बोलतात ?, पवार हे खडसे यांना राष्ट्रवादीत खुलं आमंत्रण देतात का ?, दिलं तर खडसे नेमकं काय उत्तर देतात ?, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पक्षांचे प्रमुख राजकीय नेते असले तरी गिरीश महाजन या कार्यक्रमास का नाही ?, यामागेही काही कारण आहे का ? अश्या खुमासदार चर्चा रंगल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...