S M L

जळगावात एकाच व्यासपीठावर खडसे-महाजनांमध्ये राजकीय टोलेबाजी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातली राजकीय टोलेबाजीही ऐकायला मिळाली.

Sonali Deshpande | Updated On: Mar 31, 2018 02:34 PM IST

जळगावात एकाच व्यासपीठावर खडसे-महाजनांमध्ये राजकीय टोलेबाजी

जळगाव, 31 मार्च : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यावेळी या प्रकल्पासह एकूण १३ प्रकल्पांचं उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,ऊर्जा ,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह जिल्ह्यातील आमदार -खासदार उपस्थित होते.

याच कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातली राजकीय टोलेबाजीही ऐकायला मिळाली.  एकनाथराव खडसे म्हणाले, कालच गिरीश महाजन हे दिल्लीला जाऊन आले त्यामुळे त्यांना हिंदी ऐकण्याची सवय झाली असेल म्हणून मी हिंदीत बोलतोय.

यावर जलसम्पदा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मला वाटले खडसे साहेब हिंदीमध्ये बोलत आहेत  म्हणजे राज्यसभेत गेले की काय?  मात्र खडसे साहेब आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही तुमची महाराष्ट्रeला गरज आहे.

संपूर्ण भारतातील आधुनिक ऊर्जा निर्मितीचे केंद्र हे भुसावळ थर्मल पावर स्टेशन आहे.. याठिकाणी ५०० मेगावॅटचे दोन आणि २०० मेगावॅटचा प्रकल्प आहे.. आणि आता ६६० मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2018 10:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close