अंडी महागली, प्रति शेकडा 540 रुपये

यंदाच्या मोसमात हा आजवरचा सर्वोच्च दर नोंदविण्यात आलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2017 12:04 PM IST

अंडी महागली, प्रति शेकडा 540 रुपये

14 नोव्हेंबर : 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' असं म्हणत प्रोटिनयुक्त असलेली अंडी खाण्यास उद्युक्त करणाऱ्या नॅशनल एग्ज कॉर्पोरेशन कमिटीने पुण्यात अंड्याचा आजवरचा सर्वाधिक दर घोषित केलाय. प्रति शेकडा अंड्यांचा दर आता 540 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. काल हा दर 530 रूपये इतका होता. तर 540 रूपये हा दर ग्राहकांपर्यंतचा आहे.

शेतकऱ्यांना हा दर 480 रूपये प्रति शेकडा इतका जाहीर करण्यात आलाय. दरवर्षी थंडीच्या मोसमात अंड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ होत असते. यंदाच्या मोसमात हा आजवरचा सर्वोच्च दर नोंदविण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...