खवय्यांना खूशखबर, अंड्याचे भाव उतरले

खवय्यांना खूशखबर, अंड्याचे भाव उतरले

मात्र, खवय्यांना दिलासा मिळाला असून अंड्याचे भाव 30 टक्क्याने कमी झाले आहे.

  • Share this:

02 डिसेंबर : संपूर्ण अन्न म्हणून ओळखलं जाणाऱ्या अंड्याचे भाव हे थंडीच्या मोसमात चांगलेच वाढले होते. मात्र, खवय्यांना दिलासा मिळाला असून अंड्याचे भाव 30 टक्क्याने कमी झाले आहे.

थंडीच्या मोसमात अंड्याचे भाव वाढणे हे नेहमी आहे. पण यंदा कोंबडी पेक्षा अंडे महाग झाले होते. अंड्याचे दर प्रति शेकडा 585 पर्यंत पोहोचले होते.  त्यामुळे अंड्याची मागणी ही कमी होत होती.

पण आता महाराष्ट्रात मार्गशीष महिना, कर्नाटकात अय्यप्पा महोत्सव सुरू असल्याने अंड्याची मागणी घटली आहे. त्यामुळे अंड्याच्या दरात तब्बल ३० टक्के घट झालीये. आजचे अंड्याचे दर हे ४३५ रुपये शेकडा आहेत गेल्या १५ दिवसांमध्ये हे साडे पाचशे रुपयांच्या पुढे राहिले होते. त्यामुळे 'संडे हो या थंडी रोज खावो अंडे' असं म्हणता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 06:17 PM IST

ताज्या बातम्या