News18 Lokmat

थकलेलं अनुदान देणार, राज्यातल्या 30 हजार शिक्षकांना फायदा

राज्य सरकारने अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या 2 हजार 907 शाळा आणि 4 हजार 319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 11:25 PM IST

थकलेलं अनुदान देणार, राज्यातल्या 30 हजार शिक्षकांना फायदा

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यातल्या 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या 2 हजार 907 शाळा आणि 4 हजार 319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलाय. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही माहिती दिलीय.


मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी शिक्षकांची बाजू मांडली. या घोषणेचा राज्यातील 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होईल. येत्या दोन महिन्यांत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तरतूद केली जाणार आहे.


अघोषित 403 प्राथमिक शाळा व 1829 तुकड्या, 560 अघोषित उच्च माध्यमिक शाळा, कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यानंतर पात्र होणाऱ्या 193 उच्च माध्यमिक शाळा, घोषित उच्च माध्यमिक शाळांच्या 15 तुकड्या, घोषित उच्च माध्यमिक 123 शाळा व 23 शाळांच्या अतिरिक्त तुकड्या, 19 सप्टेंबर 2016 अन्वये 20 टक्के अनुदानप्राप्त 1628 शाळा व 2452 तुकड्यांना 20 टक्के अनुदान दिलं जाणार आहे.

Loading...


या निर्णयामुळे 2907 शाळा व 4319 तुकड्यांना अनुदान मिळणार असून, 23 हजार 807 शिक्षक व 5 हजार 352 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या अनुदानासाठी सरकारकडून 275 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 11:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...