शरद पवार, सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलतात, विनोद तावडेंचा आरोप

शरद पवार, सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलतात, विनोद तावडेंचा आरोप

राज्यातील शाळा बंद केल्याच्या संदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

  • Share this:

13 मे : राज्यातील शाळा बंद केल्याच्या संदर्भात शरद पवार आणि सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलतं होते.

शाळा बंदच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान देखील विनोद तावडे यांनी शरद पवार यांना दिलं आहे. १३०० पैकी ५४७ शाळांचं समायोजन केलं असताना चुकीचं राजकीय वक्तव्य होत असल्याचं देखील तावडे म्हणाले आहेत. त्याचबरोबर तावडे यांनी डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींना देखीळ शाळा बंदच्या मुद्यावरुन टोला हाणला आहे.

कोल्हापूर शहरात देखील डाव्या विचारसरणीची लोकं पालकांमध्ये भितीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यांच्या या अपप्रचारामुळं बहुजन समाजातील विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतील. पण सरकार हा त्यांचा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नसल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 06:47 PM IST

ताज्या बातम्या