नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला आहे. टीडीएफ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळवला आहे.

नाशिक मतदारसंघात किशोर दराडे विजयी झाल्यामुळे भाजपाचे अनिकेत पाटील यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. दराडे यांना २४ हजार ३६९ मतं मिळाली तर बेडसे यांना १३ हजार ८३० मते पडली आहेत.

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ

तर दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघाचा हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखला. कपिल पाटील यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांचा पराभव केला.

शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झालाय. अनिल देशमुख हे तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा आखाडा रंगला होता. यात कपिल पाटील यांचा दणदणीत विजय झालाय.

दरम्यान काल महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक,कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात सोमवारी मतदान झाले आणि काल याची मतमोजणी करण्यात आली.

 

हेही वाचा....

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

 VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

 Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

 Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

 काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

 चार्टर्ड विमानाच्या अपघातानंतर नक्की काय घडलं?

 कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 07:52 AM IST

ताज्या बातम्या