विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपचाच झेंडा

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावघरे हे विजयी झाले आहेत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2018 08:15 AM IST

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपचाच झेंडा

मुंबई, 29 जून : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावघरे हे विजयी झाले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनिस आघाडीवर आहेत. विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी 20 हजार मतांमध्ये साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली. चार जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे.

Ghatkopar Plane Crash :'ती'ने नकार दिला होता,पायलट मारियाच्या पतीचा

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत १५व्या फेरी अखेर शिवसेनापुरस्कृत किशोर दराडे यांनी विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला आहे. टीडीएफ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बेडसे यांच्यावर विजय मिळवला आहे.

तर दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघाचा हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखला. कपिल पाटील यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांचा पराभव केला.

दरम्यान काल महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक,कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात सोमवारी मतदान झाले आणि काल याची मतमोजणी करण्यात आली.

Loading...

हेही वाचा...

VIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा !

कोण आहे प्रियंकाचा 'फेव्हरेट मॅन'?

आकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात प्रियंका चोप्रा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...