Elec-widget

छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत, ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत, ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मनी लाँड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ईडीनं पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आणलीये.

  • Share this:

मुंबई, 27 जून : मनी लाँड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ईडीनं पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आणलीये. त्यामुळं छगन भुजबळ यांच्यासह इतर आरोपींना ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ जामीनावर तुरुंगातून बाहेर आलेत.आता कोर्टात काय सुनावणी होतीये याकडे लक्ष आहे.

आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

FIFA World Cup 2018 : मेसीच्या खेळीनं टळली अर्जेंटिनावरची पराभवाची नामुष्की

बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट !

Loading...

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांनी जोरदार भाषण केलं होतं. महाराष्ट्र सदन उभारणीत भ्रष्टाचार केला नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं. मी जिंदगी का साथ निभाता चला गया असं म्हणत भुजबळ यांनी तुरुंगवासानंतरचं भाषण खुमासदार केलं होतं.

महाराष्ट्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना 4 मे 2018 रोजी जामीन मंजूर झाला होता. तब्बल दोन वर्ष भुजबळांना तुरुंगात राहावं लागलं. पण या जामीनानंतर स्वादुपिंडाच्या त्रासामुळे छगन भुजबळ हे केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. पण जामीनाचा निकाल आला आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने भुजबळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...