#EcoFriendly : अशी साकारते गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती!

मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गाईंच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविल्या जातात.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 12:16 PM IST

#EcoFriendly : अशी साकारते गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती!

प्रदीप वाडेकर, प्रतिनिधी

पुणे, 28 ऑगस्ट : अगदी काही दिवसांवर सर्वांचा आवडता सण गणोशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गाईंच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविल्या जातात. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती महिला बनवीत असून या गणेश मूर्तीना देशातच नव्हे तर परदेशातही भरपूर मागणी आहे.

प्रसाद सिंदगी या केमिकल इंजिनियरने प्लास्टर ऑफ परीस किवा रासायनिक रंग वापरून बनविलेल्या गणेशमूर्ती बनवण्याच काम हाती घेतलं आहे. पर्यावरणाला प्रदूषणाचा धोका होत असल्याचं ओळखून आपली शक्कल लढवीत त्यांने गाईच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम चालू केला आणि बघता बघता या मुर्त्यांची मागणी वाढू लागली.

यातील वैशिष्टे म्हणजे यात ७० टक्के गाईचे शेण, २५ टक्के सुपीक माती, ४ टक्के तुरटी आणि १ टक्का पंचगव्य हे सर्व एकत्र करून त्यात गोमुत्राचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणाला पूरक गणेशमूर्ती तयार होते. कारण शेणात नायट्रोजन, फोस्फर्स, पोटेशियमचे घटक असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत.

Loading...

जाणून घेऊयात नेमके काय फायदे आहेत ते...

नायट्रोजन – पाण्यात नायट्रोजन सायकलस वाढवते

फोस्फरस – जीवाणू नष्ट करण्यास मदत करते

पोटेशियम – जल शुधीकारनास कारक आहे

तुरटी – पाणी स्वच्छ करते आणि गाळ बसवते

शेण – शेणाचे फायबर मासे आणि जलचरासाठी उत्तम खाद्य

या पर्यावरण पूरक मूर्तीचे अनोखे वैशिष्ठे म्हणजे यातून 'एक गणपती एक झाड' ही संकल्पना राबविली जातेय, कारण या गणपतीबरोबर एक मोदक दिला जातो या मोदकात कडुलिंब, जांभूळ, चिक्कू अशा झाडांच्या बिया आहेत, ज्यामुळे या बिया जमिनीत रुजून याचे भविष्यात झाडात रूपांतर होईल.

मंडळी या मूर्तींचे फायदे अजून संपले नाहीत. यात आणखी खास म्हणजे मूर्तिकार प्रसाद सिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० महिला हा कारखाना चालवतात. संपूर्ण देशात महिलांनी चालवलेला गणेश मूर्ती बनविण्याचा हा एकमेव कारखाना आहे. मूर्ती बनविण्यापासून ते रंगकाम  आणि विक्रीपर्यंतचा सगळा कारभार या महिलाच पाहतात. त्यामुळे बचत गटाच्या या गरजू महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.

या वर्षी २४०० गणेशमूर्ती बनविण्याचे उद्दिष्ठ प्रसाद सिदंगी यांनी ठेवले आहे. सर्व शहरातून तसेच अमेरिका, इंग्लंड या ठिकानाहून या मूर्तींची मागणी वाढत आहे. एकंदरीत या पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पर्यावरणाला फायदाच होणार आहे. प्रत्येकाने या पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची स्थापना केली तर पर्यावरणाचा ऱ्हास नक्कीच थांबेल आणि बाप्पाला ही नक्कीच आनंद होईल.

 

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2018 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...