भूकंपाच्या धक्क्याने दुसऱ्यांदा हादरली अमरावती

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 05:52 PM IST

भूकंपाच्या धक्क्याने दुसऱ्यांदा हादरली अमरावती

अमरावती, 22 आॅगस्ट :  अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सादरावाडी या गावात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक चांगलेच घाबरले आहे. काल रात्री आलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्यामुळे प्राथमिक आरोग्य-केंद्राच्या इमारतीचा काही भागातील स्लॅब कोसळला.

15 दिवसापूर्वीही याच गावात भूकंपाचे सौम्य धक्के आले होते. काल या भूकंपाच्या वेळी धारणी येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे रात्रभर तळ ठोकून गावात हजर होते. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या घटनेला जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला असून किती रिस्टर स्केलचे होते हे समजू शकले नाही.

काल संगमनेरही हादरला

दरम्यान, मंगळवारीच अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या घारगाव, बोरबन,कुरकुंडी,माहुली परिसर जोरदार या भूकंपामुळे हादरला आहे.

आज सकाळी संगमनेर तालुक्यातील घारगाव, आंबीखालसा, कुरकुंडी, बोरबन,माहुली, माळेगाव पठार आदी गावे या भूकंपाने चांगलीच हादरली होती. काही घरांमधील भांडी पडली तर घरांचे पत्रेही जोरदार हादरले. अचानक बसलेल्या हादऱ्यांनी लोकांनी थेट घराबाहेर पळ काढला काहींनी आरडा ओरडही केली. पण नेमकं काय झाले हे कोणाला समजत नव्हते या धक्कयांची तीव्रता इतकी जोरदार होती की इमारतीमधील लोकंही घराबाहेर पडले होते. ग्रामस्थांमध्ये अक्षरश: घबराटीचे वातावरण पसरले होते.

तहसीलदार साहेबराव सोनवणे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना माहिती समजताच त्यांनी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.

सनी लिओनीची लव्ह स्टोरी - अशी पडली डॅनियलच्या प्रेमात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close