लाच न स्वीकारता DYSP नं केलं तक्रारदाराच अपहरण, व्हॉईस रेकॉर्डर व मोबाइलही हिसकावला

लोकसभा निवडणुकीच्या धुमधडाक्यात बडा पोलीस अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 01:37 PM IST

लाच न स्वीकारता DYSP नं केलं तक्रारदाराच अपहरण, व्हॉईस रेकॉर्डर व मोबाइलही हिसकावला

सातारा, 18 एप्रिल- लाच प्रकरणात फलटणचे डीवायएसपी डॉ.अभिजीत पाटील यांचा नवा 'प्रताप' प्रकार समोर आलाय. अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेची रक्कम न स्वीकारता डीवायएसपी पाटील यांनी तक्रारदाराचं आपल्या गाडीतून पळवून नेलं. तक्रारदाराचा मोबाइल आणि व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून फेकून दिला. विशेष म्हणजे अ‍ॅन्टी करप्शनने दिलेला हा शासकीय व्हाईस रेकॉर्डर आहे. नंतर त्याला गाडीतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. लोकसभा निवडणुकीच्या धुमधडाक्यात बडा पोलीस अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

तक्रारदाराने खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदाराला त्याचा 8 लाख रुपयांचा डी.डी. त्याला मिळवून देण्यासाठी डीवायएसपी पाटील यांनी त्याला 2 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. डीवायएसपी पाटील यांनी अडीच लाखांपैकी 1 लाख 75 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. मात्र, डीवायएसपी पाटील यांना या सापळ्याची माहिती समजली. नंतर लाचेची रक्कम न स्वीकारता डीवायएसपी पाटील यांनी तक्रारदाराचं आपल्या गाडीतून पळवून नेलं. तक्रारदाराचा मोबाइल आणि व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून घेवून त्याला गाडीतून ढकलून दिले. विशेष म्हणजे अ‍ॅन्टी करप्शनने दिलेला हा शासकीय व्हाईस रेकॉर्डर आहे. डीवायएसपी पाटील यांनी तक्रारदाराचा मोबाइल आणि व्हॉईस रेकॉर्डर कुठे फेकला याचा पोलीस तपास करत आहेत.

मिऴणार होती अप्पर पोलीस अधिक्षकपदी बढती

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील मुळचे कोल्हापूरचे आहेत. 2011 मध्ये ते लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. 14 जुलै 2018 रोजी फलटण उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. विशेष म्हणजे त्यांना आता अप्पर पोलीस अधिक्षक पदी मिऴणार बढतीही होती. डीवायएसपी पाटील यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...


VIDEO: मोदींच्या 'कास्ट कार्ड'वर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...