दापोलीत भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

दापोली - खेड रस्त्यावर कुंभवे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 03:35 PM IST

दापोलीत भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली,28 डिसेंबर : दापोली खेड मार्गावरील नारगोली इथं सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर आणि 'मॅक्सिमो' गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिमो चालक संदीप शेलार हे गाडी क्र.एमएच 08 एजी 2095 घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या डंपर क्रमांक एम 10 झेड 2520 याला धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, मेक्सिमोमध्ये अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या अपघातामध्ये मॅक्सिमोचा चालक संदीप शेलार हा जागीच ठार झाला. दापोली नगरपंचायतीचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी मधुकर कांबळे, जयदीश पारतुले आणि मदिया शेख, ठेमीदा शेख हे जागीच ठार झाले.


Loading...

निलेश पवार, आडेगावचा उपसरपंच संदीप पावसकर हे गंभीर जखमी असून या दोघांना मुंबईत केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.


VIDEO: ...अन् शिकारीसाठी आलेल्या सिंहालाच वासराने पळवलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2018 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...