महाराजाच्या सल्ल्यामुळे संजय काका पाटलांना खासदारकी, पतंगराव कदमांची टोलेबाजी

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी अन्य सर्वच नेत्याना विकासासाठी एकत्र या अस सांगत सल्ला दिला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2017 10:58 PM IST

महाराजाच्या सल्ल्यामुळे संजय काका पाटलांना खासदारकी, पतंगराव कदमांची टोलेबाजी

02 डिसेंबर : काँग्रेस नेते पतंगराव कदम जाहीर कार्यक्रमात कोणाची विकेट घेतील याचा काही नेम नाही. सांगलीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांची चांगलीच फिरकी घेतली.

माजीमंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या सांगलीतील पूर्णाकृती पुतळयाच्या उद्घाटन कार्यक्रमात आज काँग्रेसचे अशोक चव्हाण, पतंगराव कदम, भाजपचे खासदार संजय काका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे दिलीप तात्या पाटील, शिवसेनेचे गौतम पवार यांच्या समवेत अनेक सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

या कार्यक्रमात भाषणासाठी उभे राहिलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम यांनी भाजपच्या खासदार आणि आमदारांना चांगलेच चिमटे काढले.

आज पक्षीय पातळीवर निष्ठा राहिली नाही. कोण कधी कुठे जाईल हे सांगता येत नाही. आता बघा की हा संजय काका पाटील काँग्रेसवालाच होता. मात्र त्याचा योग आला. त्याला महाराजाचा लय नाद आहे. अरे पण ढोंगी महाराजांच्या नादाला लागू नकोस, कारण आज लय ढोंगी बाबा झालेत. पण एका महाराजाने त्याला तिकड जायला सांगितलं आणि तो खासदार झाला असं बोलत पतंगराव कदम यांनी भाजप नेत्यांना टोला मारला.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी अन्य सर्वच नेत्याना विकासासाठी एकत्र या अस सांगत  सल्ला दिला.

Loading...

महराष्ट्रात वैचारिक मतभेद आणि पक्षीय मतभेद असले तरी वैयक्तिक मतभेद मात्र कोणाचे नसतात. विकासासाठी सर्वजण एकत्र येतात आणि हाच महाराष्ट्राचा गुणधर्म आहे, अस सांगत, खासदार अशोक चव्हाण यांनी सांगलीच्या विकासासाठी सत्ताधारी आमदारांनी आणि खासदारांनी निधी आणावा असं आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 10:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...