28 मे : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे काही काळ अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांची तूर आणि भुईमूग पिकाचं मात्र नुकसान केलं.
आधीच तुरीच्या हमीभावासाठी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यापुढे नवं संकट उभं ठाकलंय. चंद्रपुर शहरासह जिल्हयाला वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने नागरिकांना काही अशी दिलासा मिळालाय. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन घरांवरचे पत्रे उडाले.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर अकोल्यातील मुर्तिजापूर तालुक्यात पावसामुळे राजनापूर, खिनखिनी या गावात घरांची पडझड झालीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा