S M L

गडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू

गडचिरोली जिल्हयात गेल्या दहा दिवसात वेळेवर उपचारासाठी रुग्णवाहीका न मिळाल्याने एका नवजात बाळासह गर्भवती मातेचाही मृत्यु झाल्याच्या दोन वेगवेगळया धक्कादायक घटना घडल्या आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 24, 2018 12:35 PM IST

गडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू

गडचिरोली, ता. 24 मे : गडचिरोली जिल्हयात गेल्या दहा दिवसात वेळेवर उपचारासाठी रुग्णवाहीका न मिळाल्याने एका नवजात बाळासह गर्भवती मातेचाही मृत्यु झाल्याच्या दोन वेगवेगळया धक्कादायक घटना घडल्या आहे. असं असताना चंद्रपुर जिल्हयात तर रुग्णवाहिका नसल्याने गर्भवती महीलेला काही किलोमीटर अंतरावर सायकलवर बसुन आरोग्यकेंद्रात नेण्यात आलं. माञ तिथ डॉक्टर आणि नर्स नसल्याने गर्भवती महीलेच्या आईनेच स्वतच्या मुलीचं बाळंतपण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनामुळे आदिवासी दुर्गम भाजातल्या भोंगळ आरोग्यव्यवस्थेच चित्र समोर आलं आहे.

अहेरी तालुक्यातील ताटीगुडमटोला येथील रहिवासी विनोदा कृष्णा पेंदाम हिला गेल्या शुक्रवारी प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. आशावर्कर सरीता पेंदामच्या मार्फत रुग्णवाहीकेसाठी प्रयत्न केले माञ वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने घरातच प्रसुती झाली. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे पुन्हा रूग्णवाहिकेसाठी आशावर्करने संपर्क केला असता, रूग्णवाहिका उपलब्ध नव्हती. काही वेळानंतर १०८ ची रूग्णवाहिका ताटीगुडम टोला येथे पोहोचली.

नवजात शिशू व मातेला रूग्णवाहिकेत बसवून उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे भरती केले. मात्र उपचारादरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ताटीगुडमटोला हे गाव कमलापूरपासून दोन किमी अंतरावर आहे. तरीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. रूग्णवाहिका ही २४ तास रूग्णालयासमोर उपलब्ध असणे आवश्यक असते. असे असतानाही डॉ. ज्योती डोंगरे यांनी सदर रूग्णवाहिका इतर कामासाठी भंडा-याला नेल्याने रुग्णवाहीका मिळाली नाही. त्यामुळे वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे.

ही घटना घडल्याच्या चौथ्या दिवशी मांडरा येथील एका पंधरा दिवसाच्या बाळंतीन असलेल्या सुशिला सिडाम या महीलेची प्रकृती बिघडली तिच्या उपचारासाठी आशा स्वंयसेवीकेकडे साहीत्य उपलब्ध नसल्याने अहेरीला पुढील उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहीका नसल्याने खासगी वाहनातुन अहेरीला नेण्यात आलं तिथ प्रकृती आणखीनच बिघडल्याने गडचिरोली नेत असताना तिचा मृत्यु झाला एकाच आरोग्यकेंद्रात घडलेल्या दोन घटनानी जनतेत रोष निर्माण झालाय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2018 12:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close